केसांसाठी असा आहे आवळा फायदेशीरकेसांसाठी असा आहे आवळा फायदेशीर

Amla For Hair या विषयी आज आपण माहिती घेणार आहोत. केसांसाठी आवळा हा फारच बहुगुणी आहे आपण सगळेच जाणतो. सध्या बाजारात आवळ्याचा सीझन सुरु आहे. सुंदर आणि चमकदार केस हवे असतील तर तुम्ही आवळ्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करायला हवा. त्यामुळे तुम्हाला त्याचे फायदे मिळण्यास मदत मिळेल. अनेक प्रॉडक्टमध्ये आवळ्याचा अर्क हा आवर्जून वापरला जातो. पण आवळा असलेले प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा जर तुम्ही आवळ्याचे सेवन केले तर तुम्हाला त्याचे अधिक फायदे मिळू शकतील.

Bald Head Reason | टक्कल पडण्याची कारणे आणि उपाय

ऑक्सिडंटचा साठा

आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन C आणि ॲंटीऑक्सिडंट असते. जे कोलॅनज बुस्टींगला मदत करते. त्यामुळे शरीरासाठी आवश्यक असलेले कोलॅजन मिळण्यास मदत मिळते. त्यामुळे केस आणि त्वचा चांगली होण्यास मदत मिळते. आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन E,A तुमच्या स्काल्पचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते. त्यामुळे तुमच्या केसांना असलेल्या कोंड्याचा त्रासही कमी होतो.

केसांच्या वाढीला देतात चालना

केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी आवळा हे एक उत्तम असे फळ आहे. आवळ्यामध्ये केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी असलेले Tannis हे तुमची रक्ताभिसरण क्रिया सुरळीत करते. त्यामुळे केसांना हवे असलेले न्युटीरिएटंस आपल्याला मिळते. केसांच्या उत्तम वाढीसाठी ते एक उत्तम असे फळ आहे. ज्याचे सेवन यादिवसात अगदी रोज केले तरी चालेल.

केसांचे आयुष्य वाढवते

काळे केस कोणाला बरं आवडणार नाहीत. पांढरे केस हे वार्धक्याची निशाणी आहे. अधिक काळासाठी केसांचा रंग काळा टिकून राहावा असे वाटत असेल तर आवळ्याचे सेवन हे फायद्याचे ठरते. आवळ्यामध्ये असलेले घटक केसांना पांढरे होण्यापासून रोखते. आवळा केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यासही मदत करते.

केसांमधील कोंड्याची समस्या करते कमी

केसांमधील कोंड्याचा त्रास हा खूप जणांना असतो. खूप जणांना कोंड्याचा त्रास हा इतका असतो की, त्यामुळे डोक्यात खपली पडणे, सतत खाज येणे असे त्रास होऊ लागतात. इतकेच नाही त्यामुळे केसांची गळतीही होऊ लागते. अशावेळी आवळा घेऊन त्याचा गर काढून तो स्काल्पला लावावा. त्यामुळे केसांमधील कोंड्याची समस्या कमी होण्यास मदत मिळते.

5+Coconut Oil | ओठांसाठी असा करा नारळाच्या तेलाचा वापर

केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर

आवळा हे केसांसाठी नैसर्गिक असे कंडिशनर आहे. जर तुम्ही आवळ्याचा अर्क काढून तो केसांना लावला. तर त्यामुळे केसांना नैसर्गिकपद्धतीने कंडिशनर मिळण्यास मदत मिळते. ज्यामुळे तुमचे केस अधिक चमकदार होतात. केसांना जी चमक अपेक्षित असते ती यामुळे मिळण्यास मदत होते.

अगदी वर्षभर जरी तुम्ही केसांसाठी आवळ्याचे सेवन केले तर त्याचे फायदे नक्कीच तुम्हाला मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *