इरशाळवाडी येथे झालेल्या दरड दुर्घटनेला आता 1 महिना पूर्ण होईल. या दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाला. सध्या येथील नागरिकांची तात्पुरती सोय करण्यात आली आहे. पण लवकरच इरशाळवाडीच्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. कारण येत्या 6 महिन्यात त्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. स्वातंंत्र्यदिनाचे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी इरशाळवाडीला देत तेथील नागरिकांशी संवाद साधला.
20 जुलै रोजी अलिबाग येथील इरशाळवाडी या गावावर दरड कोसळली आणि या गावातील अनेक घर दरडीखाली जाऊन कित्येकांचे यात प्राण गेले. या दुर्घटनेनंतर येथील नागरिकांच्या तात्पुरत्या निवासाची सोय करण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ही सोय करण्यात आलेली आहे. सध्या 42 कंटेनर रुपी घरांमध्ये हे गाव राहात आहे. याच ठिकाणी नागरी सुविंधासाठी दवाखाने, अंगणवाडी, पोलिस नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत.

ज्या दिवशी इरशाळवाडीची दुर्घटना झाली त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी भेट देत येथील सोयी-सुविधांची पाहणी केली आहे. येथील नागरिकांना दिलासा देत त्यांनी त्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन देखील दिले आहे