Vijay kadam हे रंगभूमी, मालिका आणि चित्रपटातून नावाजलेले नाव. त्यांच्या अभिनयाने त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली. आज विजय कदम यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. अखेर त्यांनी शनिवारी सकाळी त्यांच्या अंधेरी येथील राहत्या घरात अखेरचा श्वास घेतला आहे. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
90 च्या दशकात आपल्या अभिनयाने लोकांना हासवणारा हा कलाकार गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने पीडित होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण आज अखेर त्यांची ही झुंज संपली आहे. त्यांच्या जाण्याने एक उत्तम कलाकार गमावल्याची प्रतिक्रिया कलाकारांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.