Ujjain Mahakaleshwar सध्या सगळ्या सोशल मीडियावर तुम्हाला उज्जैनच्या महाकाल मंदिराचे व्हिडिओ दिसत असतील. ते व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली असेल यात तिळमात्र शंका नाही. इतकेच काय तर अनेकांनी या ठिकाणी जाण्याचे काही प्लॅन्सही केले असतील. पण महाकालेश्वर मंदिरात जाण्यापूर्वी तुम्हाला त्याची माहिती असायला हवी. जर तुम्हाला पुराणातील काही कथा माहीत असतील तर त्या ठिकाणी अध्यात्मिक होण्यासाठी तुम्हाला अधिक मदत होईल. म्हणूनच आज तुमच्यासोबत शेअर करत आहोत Ujjain Mahakaleshwar ची कथा आणि सोबत छोटासा टूर प्लॅन
उज्जैन महाकालेश्वर कथा Ujjain Mahakaleshwar
उज्जैन येथे स्थित असलेले महाकालेश्वर मंदिर हे 12 ज्योर्तिलिंगापैकी तिसऱ्या क्रमांकाचे ज्योर्तिलिंग आहे. त्याला जगभरातून मान्यता आहे. अनेक जण या महाकालेश्वराचे दर्शन घेण्यासाठी फार दुरून येतात. असे म्हणतात ज्यांच्या मनात शिवशंकर बसलेले आहेत. त्यांना एकदा तरी भगवान शिव आपल्या दर्शनासाठी नक्कीच बोलावतात. पण या महाकालेश्वर मंदिराची एक पौराणिक कथा कायम सांगितली जाते, ती आता जाणून घेऊया.
महाकालेश्वर संदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात. पण एक कथा अशी आहे की, चंद्रसेन नावाचा एक राजा होता. तो शिवाचा खूप मोठा भक्त होता. त्याची संपूर्ण प्रजा ही देखील शिवाची खूप मोठे भक्त होते. त्यामुळे या राज्यात शिवाचा वास होता. एकदा चंद्रसेन राजाच्या राज्याशेजारी असलेल्या रिपुदमन नावाच्या राजाने चंद्रसेनच्या राज्यावर आक्रमण केले. याच दरम्यान दूषण नावाच्या राजाने देखील या राज्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे सारे राज्य उद्धवस्त झाले. राक्षसाच्या उत्पादाने कंटाळलेल्या शिवभक्तांनी त्यावेळी शिवाकडे वाचवण्याचे आवाहन केले. त्यानुसार आपल्या प्रिय भक्तांना वाचवण्यासाठी धरा फाडून त्या राक्षसाचा वध करण्यासाठी शिव अवतरले. त्यावेळी त्यांनी महाकालाचे रुप धारण केले होते. त्यांनी त्या राक्षसाचा वध केला आणि जनतेचा त्याच्या जाचातून मुक्त केले. तेथील लोकांची भक्ति पाहून महाकाल तिथेच विराजित झाले. तेच हे उज्जैन येथील क्षिप्रा नदीवर असलेले महकालेश्वर मंदिर होय.
भस्म आरतीने होते दर्शन पूर्ण
महाकाल उज्जैन येथील भस्मारती ही खूपच प्रसिद्ध आहे. येथील महाकालेश्वराचे दर्शन तेव्हाच पूर्ण होते. ज्यावेळी तुम्ही भस्मारती पाहता. येथीला महाकालाला भस्म लावून शृंगार केला जातो. तेथे होणारी आरती अंगावर काटा आणणारी असते. ही आरती ज्यावेळी सुरु होते. त्यावेळी शिव तेथे आपल्यासोबत असल्याचे जाणवते. त्यामुळे ही आरती अजिबात चुकवून चालत नाही. असे देखील म्हणतात की ही आरती महिलांनी पाहू नये.
असे करा उज्जैनचे प्लानिंग
माहिती घेतल्यानंतर जर तुम्हालाही या ठिकाणी जावेसे वाटत असेल तर तुम्ही एखादी शॉर्ट टूर करु शकता. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला येथे जाता येईल.
- फ्लाईटने जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला इंदौरला उतरावे लागेल. तिथून साधारण 1.30 तासाचा प्रवास करुन उज्जैनला पोहोचता येईल. जर तुम्हाला पहाटेच जायचे असेल तर तुम्ही असा वेळ धरुन इंदौरला या जेणेकरुन तुम्ही उज्जैनला राहू शकाल.
- ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्हाला उज्जैन जंक्शनला उतरता येईल. ट्रेनच्या वेळा बघून तुम्ही प्रवास करा.
- येथे राहण्यासाठी अगदी माफक दरात हॉटेल्स आहेत. इतकेच नाही तर तुम्हाला स्वस्तात राहण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. येथे तुम्हाला झोपण्यासाठी बेड आणि आंघोळीसाठी बाथरुम अशी सोय मिळेल. तुमच्या मित्रांचा ग्रुप असेल तर तुम्ही तसे प्लॅनिंग करा.
- महाकालेश्वर मंदिरातील भस्मारतीसाठी ऑनलाईन बुकिंग करणे गरजेचे आहे. https://shrimahakaleshwar.com/ या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही आधी बुकिंग करुन घ्या
- येथून तुम्हाला ओमकारेश्वर मंदिरात देखील जाता येईल. इतक्या दूर आलात तर तेथेही जायला विसरु नका.
अगदी कोणताही वीकेंड पकडून तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. याचा खर्चही फारसा होणार नाही. तर मग करा येथे जाण्याचे प्लॅनिंग आणि शेअर करा तुमचे मस्त फोटोज