Tag: marathi news

राज्यात ‘वाचन चळवळ’ उभी करणार – मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

मुंबई – माजी राष्ट्रपती भारतरत्न दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी वाचन संस्कृती रुजविणे…

वैजापूरजवळील अपघात – मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर

मुंबई – नागपूर समृध्दी महामार्गावर मध्यरात्री वैजापूरजवळ टेम्पोच्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली…

महाराष्ट्र चेंबरचे २१ उद्योजकांचे शिष्टमंडळ इंडोनेशियाला रवाना

मुंबई : इंडोनेशिया सरकारच्या आमंत्रणावरुन आणि भारत सरकारच्या सहकार्याने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अँण्ड अँग्रीकल्चरचे २१ उद्योजकांचे शिष्टमंडळ आज जकार्ता-इंडोनेशिया दौऱ्यासाठी रवाना झाले. १९ ऑक्टोबर पर्यंत हा दौरा असल्याचे…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचा करार माझ्यासाठी ईश्वरीय कार्य – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, – छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अत्याचारी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे ब्रिटनवरून भारतात आणण्यासाठी तेथील संग्रहालयासोबत सामंजस्य करार झाला आहे. माझ्यासाठी हा साधा करार नसून हे ईश्वरीय…

राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक

राज्यातील सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाचा ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

पोलिसांची कंत्राटी भरती करून तरुणांच्या भविष्याचा आणि सुरक्षेचा खेळखंडोबा करु नका:- नाना पटोले

राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारने तरुणांच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नावर पाणी फेरले असून कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती सुरु करुन आरक्षणवरही घाव घातला आहे. सरकारचा हा निर्णय अत्यंत घातक व सुरक्षेच्यादृष्टीने गंभीर आहे.…

वांद्रे शासकीय वसाहतीच्या पुनर्विकासासाठी सविस्तर आराखडा सादर करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वांद्रे (पूर्व) येथील शासकीय वसाहतीमध्ये उपलब्ध असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या जागेची क्षमता तपासून त्याठिकाणी पुनर्विकास करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करुन सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

विद्यार्थी वसतिगृह तातडीने सुरू करण्याचे आदेश-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याचे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

वारशाचा दावा करणाऱ्यांनी आधी आरसा पहावा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपल्याला वारसा मिळाला असे म्हणणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा म्हणजे खरे काय ते कळेल असा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांना लगावला आहे.

विद्यार्थ्यांना बसणार शुल्क वाढीचा भुर्दंड

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा झालेल्या जून - जुलैच्या पुरवणी परीक्षेपासून दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात दहा टक्के वाढ करण्यात आली आहे.