सुनील केदारसुनील केदार

राज्याचे माजी मंत्री सुनील केदार आणि त्यांच्यासोबत अन्य 6 आरोपींना 5 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी रुपयांच्या सरकारी रोख खरेदी घोटाळा प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय त्यांना 12 लाख 50 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या बहुचर्चित घोटाळ्याकडे अनेकांचे लक्ष होेते.शुक्रवारी याचा निर्णय देण्यात आला आहे.

2002 साली नागपूरमध्ये असलेल्या या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 156 कोटीहून अधिक रकमेचा घोटाळा उघडकीस आला होता. त्यादरम्यान केदार हे त्या बँकेचे अध्यक्ष होते. त्यामुळे ते मुख्य आरोपीदेखील आहेत. सहकार विभागाच्या कार्यातील नियमांचे उल्लंघन करुन काही खरेदी बँकेच्या पैशातून करण्यात आली होती. ज्या खासगी कंपनीसाठी हे करण्यात आले होते. ती कंपनी दिवाळखोरीत काढल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसै यात बुडाले होते. त्यामुळे सुनील केदार यांच्यासोबत अन्य 6 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 5 ऑक्टोबर 2021 मध्ये हा खटला थांबवण्यात आला होता. पण आता यावर निर्णय देण्यात आला आहे.

दरम्यान, या शिक्षेमुळे आता सुनील केदार यांची आमदराकी रद्द होईल असे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *