Sunetra Pawar | सध्या अनेक ठिकाणी मंगळागौरीचे कार्यक्रम सुरु आहेत. या मंगळागौरीच्या कार्यक्रमाला अनेक सेलिब्रिटीही हजेरी लावतात. राष्ट्रवादी तर्फे नुकतेच मंगळागौरीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी हजर होत्या.
मंगळागौरीच्या या कार्यक्रमात सुनेत्रा पवारांनी एक झटपट उखाणा घेतला हा उखाणा सध्या सगळीकडे वायरल होताना दिसत आहे. समयसुचकता राखत अगदी पटकन असा उखाणा त्यांनी घेतला आहे. सुनेत्रा पवार या कायम अजित पवारांच्या खंबीर उभ्या असतात. त्यांनी अनेकदा काही मुलाखतीतून त्यांच्या खासगी जीवनाविषयी सांगितले आहे. त्यामुळे त्यांची ही जोडी एक आदर्श जोडीहून काही कमी नाही.
अरेंज मॅरेज असूनही सुनेत्रा पवार यांनी सगळ्या जबाबदाऱ्या अगदी योग्यरित्या पार पाडल्या आहेत. त्या आजही राष्ट्रवादीच्या अनेक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतात.