रामदास आठवलेरामदास आठवले

छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजप ला पाठिंबा देण्यात येत असल्याची घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केली. छत्तीसगढच्या विधानसभेच्या एकूण 90 जागा असून त्यापैकी एकाही जागेवर रिपब्लिकन पक्षाचा उमेदावार उभा करण्यात येणार नाही. सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा असेल अशी अधिकृत घोषणा रामदास आठवले यांनी केली.

भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागील 9 वर्षात अनेक चांगली कामे झाली आहेत.नविन संसद भवनाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संविधान असे नाव दिले आहे.मराठा ब्राह्मण.लिंगायत आदी सर्व सवर्ण जातीमधील गरिबांना लाभाचे ठरणारे 10 टक्के आर्थिकदुष्टा मागासवर्गीयांना EWS आरक्षण सुरु करण्यात आले आहे.काश्मिरमधील कलम 370 हटविले असल्यामुळे काश्मिर मध्ये एक नविन प्रगतीचे युग सुरु झाले आहे.महिलांच्या जिवनात क्रांतिकारी ठरणाऱ्या 33 टक्के राजकिय आरक्षणाचे महिला विधेयक हे मोदिंनी मंजुर केले आहे. तीन तलाकचा ही कायदा मंजुर करण्यात आला आहे. महिलांच्या न्याय हक्काचे अनेक कायदे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेजी 20 या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अध्यक्षपदाचा मान भारत देशाला लाभला.त्यांचे उत्कृष्ठ अध्यक्षपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पार पाडले.जगात भारताचा मान वाढलेला आहे.जगात सर्वात लोकप्रिय नेते म्हणुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नोंद झाली आहे.जगात आर्थिकदृष्टा भारताची पहिल्या 5 क्रमांकामध्ये नोंद होती.आता भारत 3 ऱ्या क्रमांकावर आलेला देश आहे.आर्थिकदृष्टा प्रगती करणारा जगातला 3 ऱ्या क्रमांकावर भारताची आज नोंद आहे.

येत्या काही काळात भारत हा जगातला आर्थिकदृष्टा संपन्न असणारा प्रथम क्रमांकाचा देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात होईल असा आम्हाला विश्वास आहे.शेतकऱ्यासाठी करण्यात आलेले कायदे शेतकऱ्यांच्या मागणीमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ते रद्द केले.हा एक ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला.लोकांच्या मागणीचा मान त्यांनी ठेवला.त्यामुळे देशात सुरु असलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणूकित छत्तिसगढच्या सर्व जागावर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा राहील आणि भाजपला बहूमताने निवडुन आणण्यासाठी रिपब्लिकन पक्ष आता मैदानात उतरेल आणि भाजपाच्या खांद्याला खांदा लावून 5 ही राज्यामध्ये भाजपाला पाठिंबा रिपब्लिकन चा राहणार आहे..5 राज्याच्या विधानसभा निवडणुकित 4 राज्यामध्ये भाजपला विजय नक्की मिळेल. असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.देशभरातील आंबेडकरी जनता; रिपब्लिकन पक्ष भाजपाच्या पाठीशी असल्याचे ना.रामदास आठवले या वेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *