Parkinson Day Know Symptoms Of Parkinson and types

पार्किन्सन रोग हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जो प्रामुख्याने एखाद्याच्या दैनंदिन हालचालींवर परिणाम करतो. जर एखाद्याला पार्किन्सन्सचा आजार असेल तर थरथरणे, स्नायुंमधील कडकपणा, चालणे आणि हालचाल करण्यास येणाऱ्या अडचणी आणि असंतुलन यांसारखी लक्षणे दिसून येतात. डॉ. पंकज अग्रवाल, न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख, ग्लेनईगल्स हॉस्पिटल, परेल, मुंबई यांनी अधिक माहिती दिली आहे. 

काय आहेत टप्पे?

हे एखाद्याच्या दैनंदिन कामांमध्ये व्यत्यय आणतात आणि जीवनाच्या गुणवत्तेवरही परिणाम करतात. आणखी एक सामान्य लक्षण म्हणजे हालचाल मंदावणे ज्यामुळे हालचाल करण्यात अडचणी येतात, चालण्याचा वेग कमी होतो आणि एकूणच शारीरीक हालचाल कमी होते. 

लक्षणे टप्प्यांवर आधारित 

पार्किन्सनच्या नंतरच्या टप्प्यांमध्ये मेंदूवर परिणाम होऊन स्मरणशक्ती कमी होणे आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येणे, नैराश्य, चिंता, झोपेसंबंधीच तक्रारी आणि थकवा येऊ शकतो. पार्किन्सन्स ग्रस्त लोकांनी मोटर आणि नॉन-मोटर लक्षणे प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी आणि डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेतला पाहिजे. लक्षणे समजल्यानंतर वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे आणि हे उपचार या रोगाच्या लक्षणांवर आणि टप्प्यावर आधारित असतील. 

काय आहेत लक्षणे 

पुढे झुकलेली शारीरिक स्थिती, हावभाव नसलेला चेहरा, एकसुरी आणि अडखळत बोलणे, जेवण गिळण्यासाठी त्रास, चालताना कमी झालेली हात हलवण्याची क्रिया, थरथरत्या आणि अतिशय हळू हालचाली, स्नायुंमधील ताठरता आणि जवळ जवळ व छोटी पाऊले टाकत चालणे, तोल सांभाळता न आल्यामुळे वेळोवेळी पडणे अशी काहीशी लक्षणे या रोगात आढळून येतात

टप्पे घ्या जाणून

  • सौम्य टप्पा: पार्किन्सन रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, एखाद्याला सौम्य लक्षणे दिसू येतात जी त्यांच्या दैनंदिन क्रियांवर किंवा एकूणच आरोग्यावर लक्षणीय परिणाम करत नाहीत. या टप्प्यातील सामान्य लक्षणांमध्ये थरथरणे आणि हालचाल करण्यात अडचणी येणे यामध्ये प्रामुख्याने शरीराची एका बाजू प्रभावित होते. सुदैवाने, ही प्रारंभिक लक्षणे कमी करण्यात औषधे उपलब्ध आहेत
  • दुसरा टप्पा: स्नायूंमधील कडकपणा आणि दुसऱ्या टप्प्यात एखाद्या व्यक्तीला थरथरणे, आणि चेहऱ्यावरील असामान्य हावभाव दिसून येतात. एखादे कार्ये पूर्ण करताना स्नायूंमधीस ताठरपणासारख्या हालचालीतील अडचणी समस्या निर्माण करु शकतात. एखाद्या व्यक्तीची पाठ आणि मान दुखू शकते. या अवस्थेतील व्यक्ती सामान्यतः स्वावलंबी जगू शकतात परंतु त्यांच्या लक्षणांमुळे दैनंदिन क्रिया करताना काहीवेळा संघर्ष करावा लागू शकतो
  • प्रगत अस्थेतील पार्किन्सन्स रोगामध्ये संतुलन बिघडते. परिणामी हालचाल करण्यात अडचणी येऊ शकतात किंवा संबंधित व्यक्ती अधिक हळू चालत आहेत असे दिसते. या टप्प्यात फॉल्सची(पडण्याची) वारंवारता वाढते. मोटर कौशल्यांवर लक्षणीय परिणाम होतो. मोटर फंक्शनमधील हा बिघाड एखाद्याच्या स्वावलंबनावर अडथळा आणू शकतो आणि अनेकांना चालण्यासाठी आधाराची तसेच साधनांची आवश्यकता भासते. या टप्प्यात दैनंदिन कामे अवघड होतात.
  • प्रगत पार्किन्सन रोग स्नायुंमधील कडकपणाचा टप्पा – हा आजाराचा प्रगत टप्पा आहे. या टप्प्यावर, अत्यंत कडकपणामुळे उभे राहणे किंवा चालणे अशक्य होऊ शकते. ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. दुर्दैवाने, अशा व्यक्तींना व्हीलचेअरवरचा आधार घ्यावा लागतो.

विशिष्ट लक्षणे दिसताच त्वरीत वैद्यकिय सल्ला घेऊन वेळीच उपचारांना सुरुवात करणे योग्य राहिल. रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता वाढविण्यात वैद्यकिय उपचार नक्कीच फायदेशीर ठरु शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *