Normal Delivery Exercise | प्रेग्नंसीचा काळ चांगला तेव्हाच म्हणावा लागतो ज्यावेळी डिलीव्हरीही कोणतीही त्रास न होता होते. आता अनेक जण म्हणतात की डिलीव्हरी होणे आपल्या हातात नाही. ही गोष्ट तशी तर साफ खोटी असं म्हणता येणार नाही. याचे कारण असे की, डिलीव्हरीच्या शेवटच्या टप्प्यात जर काही बदल झाला तर तुमची डिलीव्हरी कशी होणार हे सांगता येत नाही. परंतु हल्ली अनेक चांगले डॉक्टर महिलांना नॉर्मल डिलीव्हरी होण्यासाठीच आधीपासून काही गोष्टी करण्यात सांगतात. असे केले तर तुम्हाला डिलीव्हरीच्या वेळेस अडचणी येणार नाही
ही चार आसनं ठरतील उपयुक्त
तुमची गर्भधारणा ही नैसर्गिक असेल आणि तुम्हाला व्यायामाची परवानगी दिलेली असेल. तर केवळ झोपून न राहता तुम्ही शरीराची थोडीतरी हालचाल करायलाच हवी, असे केले तर तुम्हाला डिलीव्हरीच्या काळात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. ही चार आसनं तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे केव्हाही चांगले. या आसनांमुळे तुमच्या पेल्विक एरियाचे चांगले स्ट्रेच होते. शिवाय त्यामुळे डिलीव्हरीसाठी तुमची गर्भपिशवी कोणत्याही अडचणीशिवाय उघडते. ज्यामुळे नॉर्मल डिलीव्हरी होणे शक्य होते.
- वज्रासन
- वीरभद्रासन
- त्रिकोणासन
- बद्धत्रिकोणासन
वरील दिलेली आसन गरोदरपणात केल्यामुळे तुमच्या पचनाच्या समस्या देखील कमी होतात. शिवाय शरीर लवचिक राहते. ज्यामुळे डिलीव्हरीसाठी त्रास होत नाही. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही आसनं करु नका.