नो तिलक नो एंट्रीनो तिलक नो एंट्री

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच गुजरात सह देशभरात मोठ्या प्रमाणात गरीबाचा उत्साह पाहायला मिळतो. लहान पोरांसह तरुण आणि ज्येष्ठांचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग असतो .गुजरात येथे तर नवत्रोत्सवासाठी तर मोठ्या प्रमाणात तयारी केली जाते. यातच वडोदरा येथील वीएनएक च्या गरबा मध्ये एका वेगळाच प्रकार समोर आला आहे. या गरबाच्या आयोजकांनी लावलेल्या एका बोर्डची चर्चा चांगलीच रंगली आहे ती म्हणजे नो तिलक नो एन्ट्री. म्हणजेच तुम्हाला गरबा खेळायचा असले तर आदी कुंकूचा टिळा लावा मग तुम्हाला आत मध्ये गरबा खेळायला प्रवेश देऊ.

काही दिवसपूर्वी अहमदाबाद येथे झालेल्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या शौर्य यात्रा संपन्न झाल्या होत्या. त्या दरम्यान आयोजकांना ‘लव जिहाद मुक्त गरबा’ व्हावा अशी आग्रही मागणी जोर धरत होती. याच नंतर गुजरात येथील वडोदरा येथे कपाळावर कुंकूचा टिळा लावून प्रवेश दिला जाणार असा निर्णय घेण्यात आला.

आधार कार्ड आणि गौ मूत्रचे तिलक
गरबाला लव्ह जिहाद मुक्त असावा अशी आग्रही मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात आली होती. याच मागणीला होकार देत वडोदरा येथे वीएनएक गरबाच्या आयोगकांनी ही शक्कल लढवली आहे. आधार कार्ड चेक करून आणि गोमूत्र आणि कुंकूचे टिळक करूनच सर्वाना गरब्याची परवानगी दिली जात आहे.

हिंदू धर्मात तर टिळा लावायचे ही खूप आधी पासूनची प्रथा आहे, यात काहीच नवीन नाही. यातच जेव्हा अधिशक्तीची आराधना करायची असेल तर गरबा खेळणाऱ्यानी कुंकूचा टिळा लावलाच पाहिजे. जर कोणी हे लावले नसेल तर त्याला प्रवेश दिला जाणार नाही.

मयंक पटेल, आयोजक , वडोदरा नवरात्री फेस्टिवल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *