Never Compare आपल्या इच्छित यश मिळत नसेल त्यावेळी आपली चिडचिड होणे हे स्वाभाविक आहे. याचा परिणाम हा कधीकधी आपण दुसऱ्याशी तुलना करण्यापर्यंत जाऊन पोहोचतो. आपण दुसऱ्याशी आपली इतकी तुलना करु लागतो की, आपण आपल्या सगळ्या गोष्टी आपले टार्गेट हे सगळे काही विसरुन दुसऱ्याशी तुलना करण्यामागेच लागतो. असे अनेकांच्या बाबतीत होते. त्यातून आपण अनेकदा कुठेतरी भलतेच भरकटत जातो. तुम्हालाही यश तुमच्यापासून दुरावले असे वाटत असेल तर नक्कीच तुम्ही काही अशा चुका करत आहात ज्या तुम्हाला जाणवत नाहीत. चला जाणून घेऊया यासाठी काय करायला हवे
Govardhan Eco Village | महाराष्ट्रातील या ‘वृदांवन’ला नक्की द्या भेट
सतत यशाचा विचार करणे
खूप जणांना येणाऱ्या अपयशामुळे ते सतत कधी यश मिळेल याचाच विचार करुन काम करतात. त्याच्यामुळे त्यांच्या कामातील जिद्द कमी आणि ते काम पूर्ण करण्याचा द्वंद्व सुरु होतो. तुमचे काम हे समाधानासाठी नाही तर केवळ यश मिळेल या हिशेबाने होत राहते. एखादी नवी गोष्ट तुम्ही त्यातून चांगले पैसे कमावण्यासाठी शिकत असाल परंतु त्याचा खोल अभ्यास न करता केवळ पैसै मिळवण्याच्या हेतूने अभ्यास करत राहाल तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार नाही. ‘कर्म करते रहो फल की चिंता मत करो’ हे का म्हणतात? याचे कारणच असे आहे की, तुम्ही एखादी गोष्ट नव्याने सुरु केली असेल तर आणि यश मिळण्यास वेळ लागत असेल तरी काम करणे सोडू नका. तुम्हाला कधीतरी यातून यश मिळणार आहे हे लक्षात ठेवा.
दुसऱ्याशी तुलना घातक
आपल्या सगळ्यांचाच एक स्वभाव असतो आपण सतत आपली तुलना दुसऱ्याशी करत राहतो. अमुक एका व्यक्तिला काही न करता सगळे काही मिळाले आणि मी इतकी मेहनत करुनही मला काही मिळत नाही. हो, हे वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण तुम्ही थोडं थांबून विचार केला आहे का? या सगळ्याचा त्रास तुम्हाला किती होतोय. तुम्ही तुमचा विचार करणं सोडून दिलाय. तुम्ही केवळ दुसऱ्याशी आपली तुलना करु लागला आहे. समोरची व्यक्ती काय करते? काय नाही याकडे तुमचं अधिक लक्ष आहे. हीच गोष्ट तुम्हाला टाळायची आहे. कधी कधी काही गोष्टी मिळवण्यासाठी एक पाऊल मागे घ्यावं लागतं. पुढे तुम्हाला हे सगळं मिळवायचं असेल तर तुम्हाला थोडं शांत राहावं लागतं. तुलना करण्यापेक्षा तुम्हाला ते मिळवण्यासाठी जी मेहनत करावी लागते ती करा. बघा तुमचे लक्ष नक्कीच त्यातून बाहेर पडेल.
स्वत:साठी वेळ
मनुष्याचे आयुष्य हे आपल्याला कितीतरी आयुष्य जगल्यानंतर मिळते. हे आयुष्य मिळाले आहे ते जगण्यासाठी नाहक गोष्टींवर खर्च करण्यासाठी नाही. तुम्ही तुमच्या शरीराची काय काळजी घेता. स्वत:साठी असं कधी काय करता? हे एकदा स्वत:लाच विचारा. आपल्या शरीराकडे एकदा निरखून पाहा. त्याला आनंदी ठेवण्यासाठी तुम्ही काही केले तर तुमचे आयुष्य हे खूप सुदंर जाईल. तुमचा संपूर्ण स्वभाव त्यामुळे बदलून जाईल. तुम्ही जास्त उर्जेने आणि चांगली कामं कराल यात कोणतीही शंका नाही.
आता दुसऱ्याशी तुलना न करता आपल्या आयुष्याच्या विकासासाठी असा बदल करा. तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही.