Nature Cure ही संकल्पना आता सगळीकडे चांगलीच रुळू लागली आहे. भारताला आयुर्वेदाचे असलेले वरदान हे मानवाच्या उत्तम आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरले आहे. पण हल्ली पटकन इलाज आणि आराम ही संकल्पना अनेकांना पटत असल्यामुळे Nature Cure वर तसा कोणीही विश्वास ठेवायला बघत नाही. परंतु पुन्हा एकदा Nature Cure चे वेड अनेकांमध्ये वाढताना दिसत आहे. आपले शरीर हे आहे त्या परिस्थितीत आपली योग्य काळजी घेऊ शकते हे लक्षात आल्यामुळेच आता अनेक जण आपल्या निसर्गालाच आपला डॉक्टर मानू लागले आहेत. अनेक अभ्यासांती असे देखील दिसून आले आहे की, विविध दुर्धर आजारातून सुटका मिळवण्यासाठी याची मदत मिळाली आहे.
Keep Away Heart Attack | या गोष्टींचे सेवन ह्रदय ठेवेल निरोगी
काय आहे Nature Cure
आता तुम्ही म्हणाल आता हा कोणता प्रकार आहे? ज्यांना माहीत नाही त्यांना सांगावेसे वाटेल की, Nature Cure हे अन्य काही नसून नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन केलेल्या काही उपचारपद्धती आहेत. त्यांचा अवलंब केल्याने अनेकांचे आयुष्य समृद्ध झाले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल? हे कसे काय? तर नेचर क्युअर हे आपल्याला असणाऱ्या आजारांना समजून त्याप्रमाणे काम करते. सूर्य हा सगळ्यात महत्वाचा घटक असून आपले आरोग्य हे त्यावर अवलंबून असते. त्यामुळेच विविध झाडे, पाने , फुले येतात. त्याच प्रमाणे निसर्गात असलेला प्रत्येक घटक हा आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतो. माती, पाणी, अग्नी यांचा योग्य वापर करुन नेचर क्युअर केले जाते.
उदा. आपले डोके दुखले की, आपण जी माहीत असलेली गोळी पटकन घेतो आणि आपला त्रास त्या काळासाठी दूर करतो. परंतु ते दुखण्यामागे जर काही कारणं असतील तर त्याकडे आपण आधीच दुर्लक्ष केले आहे हे मात्र आपण विसरतो. आपले शरीर आपल्याला शरीरात झालेला बिघाड हा दाखवत असते. परंतु त्याकडे आपण दुर्लक्ष करतो त्याचे मूळ कारण जाणून न घेता आपण थेट त्याला तिथेच शमवतो. पण तो त्रास त्यानंतर कधी वाढतो हे आपल्याला कळत नाही.
Nature Cure हे त्याच पद्धतीने काम करते. काही गोष्टींचा त्रास तुम्हाला होत असेल तर त्यावर लगेच तुम्हाला आराम मिळेल असे अजिबात होणार नाही. थोडा वेळ तुम्हाला नक्कीच लागेल. पण त्याचे मुळापासून कारण शोधण्यासाठी ते नक्कीच मदत करेल.
सेंटर्स होत आहेत
हल्ली मुंबई आणि मुंबई बाहेरील अनेक ठिकाणी नेचर क्युअर सेंटर सुरु करण्यात आलेली आहेत. तुम्ही तेथे जाऊन तुमच्या संपूर्ण शरीराचे शुद्धीकरण करु शकता. त्यामुळे अनेक आजार तुमच्यापासून दोन हात दूर राहतात. इतकेच नाही तर तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होतो त्या मागचे कारण काय? हे देखील कळण्यास मदत होते. तुम्हालाही असा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच अशा सेंटर्सना भेट द्यायला हवी.