मुंबई मराठी संस्थामुंबई मराठी संस्था

मुंबईतील माणसं ही अगदी घड्याळाच्या काट्या प्रमाणे धावत असतात, असेच धावपळीचे जीवन जगत असताना सर्व माणसं एकत्र जोडली जातील ह्या उद्देशाने सार्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना झाली. याच सार्वजनिक मंडळांना एकत्र आण्यासाठी आणि आपला उत्सव सर्वांसमोर पोहचावा यासाठी आजच्या या जगात सोशल मीडियाचा एक खूप मोठा वाटा आहे. याच उद्देशायाने मुंबईतील 5 तरुण मंडळांनी एकत्र येत मुंबईची नवरात्री या एका फेसबुक पेजची सुरुवात केली. आज तब्बल 11 वर्षांनी या पेजचे रूपांतर एका संस्थे मध्ये झाले.

मुंबईल गणेशोत्सव प्रमाणे नवरात्रोत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच मंडळांना एकत्र आण्यासाठी आणि मंडळातील प्रश्न सोडविण्याशी या तरुणांनी पुढाकार घेतला. 2012 साली या तरुणांनी एका फेसबुक पेज वर सुरुवात केली. मंडळांचा प्रतिसाद बघता या पेजचे रूपांतर एका संस्थेमध्ये झाले. शासन दरबारी नवरात्रोत्सव मंडळाचे प्रश्न सोडवण्यासाठी या तरुणांचा मोठा सहभाग आहे. आजच्या तारखिले या संस्थेचे एकूण 22 प्रमुख पदाधिकारी असून 250 हून अधिक मंडळ या संस्थेसोबत जोडले गेले आहेत.

सामाजिक बांधिलकी
संस्थे सोबत जोडून असलेली तरुण वर्ग व पदाधिकारी हे सामाजिक बांधिलकी देखील जपत आहेत. संस्थेच्या वतीने कोरोना काळात अन्न दान, अंबरनाथ येथील शालेय विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी लागणाऱ्या वस्तू वाटप, या सारख्या अनेक सामाजिक उपक्रम संस्थेच्या वारीने राबविण्यात येत असतात.

मुंबईत गणेशोत्सव संदर्भात मंडळांच्या प्रश्न शासन दरबारी मांडणीशी समन्वय समिती आहे, मात्र नवरात्रोत्सव साठी नाही. याच उदिष्टाने आम्ही तरुण वर्ग एकत्र येऊन या संस्थेची सुरुवात केली. याच सोबत सामाजिक कामात देखील संस्था आग्रही आहे.
प्रकाश परमार, उपाध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *