गोपींचद पडाळकरगोपींचद पडाळकर

सामनातील अग्रलेख हा कायम चर्चेचा विषय असतो. शिवसेना पक्षाचे मुखपत्रातील लेख, अग्रलेखातून राजकारणात आज रोख कोणावर हे पाहता येते. आता एका आणखी अग्रलेखाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मोदी सरकारला ‘इंडिया’ची धास्ती वाटणारच,” अशी बोचरी टीका ‘सामना’तील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यावर सडकून टीका केली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पडळकरांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. अग्रलेख वाचून पडळकरांना संत तुकाराम महाराज यांचा अभंग आठवला. पडळकरांनी टि्वट करीत संत तुकारामांच्या अंभगाच्या दाखला देत राऊतांची खिल्ली उडवली आहे. ‘पोपटा’च्या ‘सामना’तील लेख वाचला आणि संत तुकाराम महाराजांचा अभंग आठवला,अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली.

इंडिया’ आघाडीचे युद्ध हुकूमशाही प्रवृत्तीविरुद्ध आहे.सर्वच योद्धे मैदानात उतरले आहेत. ही लढाई देश वाचविण्यासाठी आहे. मुंबईनेच ब्रिटिशांना ‘चले जाव’, ‘भारत छोडो’चा आदेश दिला होता. त्याच मुंबईतून ‘हुकूमशाही चले जाव’चा आदेश ‘इंडिया’ आघाडीने दिला आहे. ‘इंडिया’ जिंकेल, भारत अखंड राहील. लोकशाही विजयी होईल! स्वातंत्र्यवीरांचे पुण्य अद्यापी संपलेले नाही, असे ठाकरे गटाने अग्रलेखात नमूद केले आहे.

काय आहे अग्रलेखात

चार गाढव एकत्र चरत असले तरी हुकूमशहाला दरदरून घाम फुटतो. त्याला वाटते की, ते आपल्याविरुद्ध कारस्थाने करून सत्ता उलथवीत आहेत.इकडे मुंबईत तर देशाच्या राजकारणातील 28 प्रमुख राजकीय पक्ष आणि त्यांचे दिग्गज नेते दोन दिवस एकत्र जमले व त्यांनी देशातील हुकूमशाही राजवट उलथवून टाकण्याचा एल्गार केला. त्यामुळे मोदी सरकारला ‘इंडिया’ची धास्ती वाटणारचस्वातंत्र्यपूर्व काळात एक वर्ग असा होता की, त्यांना ‘ब्रिटिशांचे राज्य हे ईश्वरी वरदान आहे. या देशातील बजबजपुरी नष्ट होऊन येथे कायद्याचे, सामाजिक सुधारणेचे राज्य निर्माण होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *