पूनम क्षीरसागर हत्या प्रकरणावर काय म्हणाले पालकमंत्रीपूनम क्षीरसागर हत्या प्रकरणावर काय म्हणाले पालकमंत्री

मानखूर्दमधील एका घटनेने सगळ्यांनाच अनधिकृत रहिवाशांवर पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडले आहे. पूनम क्षीरसागर नावाच्या तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडली. निजाम नामक एका टॅक्सी ड्रायव्हरने तिला पळवले तिचा खून केला आणि त्यांनतर तिला बॅगेत भरुन निर्जन ठिकाणी टाकून दिले. या घटनेने अनेकांच्या पायाखालील जमीन सरकली. लव्ह- जिहादचे हे प्रकरण असल्याचा स्थानिकांचा आरोप होता. या कुटुंबाची भेट पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतीच घेतली. त्यावेळी त्यांनी अनधिकृतपणे राहणाऱ्या रोहिंग्यावर चिंता व्यक्त केली आहे. हे असेच सुरु राहिले तर हिंदू महिला सुरक्षित नाहीत अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की, मुंबईतील ही तिसरी घटना आहे. या कडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. मुंबईत अनधिकृतपणे राहणाऱ्या रोहिंग्या, बांग्लादेशिंचा बंदोबस्त करायला लागेल. पूनम क्षीरसागर हिला न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री, राज्य सरकार एक घटकन म्हणून प्रयत्न करणार.या शिवाय त्यांनी येत्या 24 तासात आरोपीर कठोर कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

घटना काय?

काही दिवसांपूर्वी उरणच्या जंगलामध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला होता. स्थानिकांना वास आल्यामुळे त्यांनी तक्रार केली असता हा वास बॅगमधून आल्याचे समजले. यातील मृतदेह हा सडला होता. त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्र चालवून अगदी काहीच दिवसात नजीम नावाच्या टॅक्सी ड्रायव्हरला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीनुसार या दोघांचे संबंध होते. ती घरकाम करत होती. तर नजीम टॅक्सी चालक होता. त्याला पूनमवर अन्य पुरुषांसोबत संबंध असल्याचा संशय होता. त्यावरुन त्याने तिचा काटा काढायचे ठरवले. त्याने तिला फिरायला जातो सांगून नेले. त्यानंतर तिने त्याचा खून केला. बॅगमध्ये भरले आणि उरणच्या जंगलात जाऊन त्याने बॅग टाकली.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *