कोरेगाव भीमा चौकशी संदर्भातील एक अत्यंत महत्वाची अशी बातमी समोर येत आहे. कामकाज पूर्ण करण्यासाठी आणि अंतिम अहवाल सादर करण्यासाठी कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.दिलेल्या कालावधीत आयोगाने या प्रकरणी उर्वरित कामकाज पूर्ण करून अहवाल सादर करावा, असा शासन निर्णय राज्याच्या गृहविभागाच्या वतीने घेण्यात आला आहे.
शासन निर्यणानुसार या घटनेबाबत चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. कलकत्ता सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश जय नारायण पटेल यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी केली जाणार आहे. मुदतवाढीच्या कालावधीत येथील संपूर्ण कामकाज आणि अहवाल हा सादर करण्याचे अधिसुचनेमध्ये नमूद केले आहे.