मेंदी लावणे योग्य की अयोग्यमेंदी लावणे योग्य की अयोग्य

Henna Application केसांना झटपट रंग द्यायचा असेल मेंदी हा त्यावर एकदम उत्तम असा पर्याय आहे. मेंदी ही केमिकल्सनी भरलेल्या रंगापेक्षा कधीही चांगली असा विचार करुन आपण ती केसांना लावतो. खरं पण तुम्हाला माहीत आहे का? हीच मेंदी जर योग्य नसेल तर त्यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते. केसांना मेंदी लावणे चांगले असे म्हणणारा एक गट असेल तर मेंदी चांगली नाही असे म्हणणारा देखील एक गट असेल.पण या मागील सत्य नेमके काय हे आज आपण जाणून घेऊया.

केसांना मेंदी लावणे चांगले पण…. Henna Application

केसांना आपण मेंदी लावतो ती मेंदी आपण विकत आणलेली असते. त्यावर अनेक प्रयोग करुन ती मेंदी पावडर तयार झालेली असते. अशी मेंदी लावल्यानंतर तुमचे केस हे काही काळानंतर तुमचे केस रुक्ष होऊ लागतात. सतत अशी मेंदी लावली तर त्यानंतर केस हे कालांतराने आपले मॉइश्चर घालवून बसतात. त्यामुळे केस गळती, केस दुभंगणे असे त्रास होऊ लागतात. सुरुवातीला आपण मेंदी लावतो त्यामुळे होत आहे हे आपल्या लक्षात येत नाही. परंतु कालांतराने हा त्रास मेंदीमुळे होतो हे लक्षात येते. त्यामुळे बाजारातून आणलेली मेंदी ही नेहमीच तुमच्यासाठी त्रासदायक ठरु शकते हे लक्षात ठेवा.

जर तुम्ही कधी मेंदीचे झाड पाहिले असेल तर त्या झाडाची पाने घेऊन जर तुम्ही ताजी मेंदी वाटली तर अशी मेंदी केसांना त्रास देत नाही. उलट त्यामुळे तुमचे केस अधिक सुंदर होण्यास मदत मिळते. मेंदीची पाने घेऊन त्यात आवळा घालून जर त्याचा एक लेप करुन केसाला लावला आणि त्यानंतर स्वच्छ माईल्ड शॅम्पूने केस धुतले तर त्यानंतर केस अधिक सुंदर दिसतात.

Makar Sankrant 2024 | चुकूनही घालू नका काळे कपडे, वाचा कारण

मेंदी अजिबात लावू नका

जर तुम्हाला नैसर्गिक मेंदीची पाने मिळणे शक्य नसेल तर तुम्ही बाजारातून आणून मेंदी लावू नका. शहरात राहताना आपल्या केसांना केमिकल्सची सवय झालेली असते. अशावेळी जर तुम्ही मेंदीचा प्रयोग केला तर तुमच्या केसांना ती सूट होत नाही. त्यामुळे तुमचे केस अधिक गळू लागतात. ज्यांना आधीच केसांच्या समस्या असतील अशांनी तर मेंदीचा प्रयोग करणे टाळलेलेच बरे. जर तुम्ही केसांना रंग लावत असाल आणि अचानक मेंदीचा प्रयोग सुरु केला तरी देखील केस गळण्याची, तुटण्याची, दुभंगण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांवर कोणतेही प्रयोग झालेले असतील तर मेंदी लावणे टाळा.

आता केसांना मेंदी लावताना या गोष्टीचा विचार करा. केसांना हानी पोहोचवयाची नसेल तर तुम्ही केसांना केमिकलयुक्त मेंदी लावणे टाळा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *