हळदीकुंकू वाणहळदीकुंकू वाण

Haldi kumkum Ideas सध्या अनेक घरात हळदीकुंकवाचा कार्यक्रम सुरु आहे. रथसप्तमीपर्यंत चालणाऱ्या या हळदीकुंकवाची अनेकांची तयारी झाली असेल तर काही जण अजूनही काय वाण देऊ या शोधात असतील. तुम्हालाही कोणते वाण द्यावे हे कळत नसेल तर त्यासाठीच आजचा लेख तुम्हाला मदत करणार आहे. वाण निवडताना ते कसं असायला हवं? तुमच्या बजेटमध्ये बसणारं वाणं कोणतं? ते बजेटमध्ये कसं बसवावं याची माहिती आज आपण या लेखातून घेणार आहोत.

Makar Sankrant 2024 | चुकूनही घालू नका काळे कपडे, वाचा कारण
Tilgul Recipe | असे बनवा घरच्या घरी तिळाचे लाडू, टिप्स आणि ट्रिक्स

मकरसंक्रातीनंतर ते रथसप्तमीपर्यंत महिला हळदीकुंकवाचा कार्यक्रम ठेवतात. त्यानिमित्ताने घरी मैत्रिणींना बोलावून त्यांना मान पान आणि गप्पाटप्पा करण्याचा हा दिवस असतो. याच हळदीकुंकवाचा भाग म्हणून एखादी छोटी भेटवस्तू देण्याची आपल्या सगळ्यांकडे पद्धत आहे. जो तो आपल्याला जमेल तसे वाण देत असतो. त्यात एक मान असतो. यामध्ये कमी-जास्त, लहान-मोठे असे काही नसते बरं का! तुमच्या मनातील भावना या त्यात महत्वाच्या असतात. त्यामुळे वाण देताना सगळ्याच गोष्टीचा विचार व्हायला हवा. वाण असे हे जे वाया जायला नको.

Haldi kumkum Ideas द्या हे वाण

इथे आम्ही वस्तूंची यादी देत आहोत. यापैकी तुम्हाला पटेल ती वस्तू तुम्ही निवडा.

  1. साखर- रोजच्या वापरातील साखर हा एक उत्तम पर्याय आहे. साधाऱण 1 किलो साखराचे पुडे तुम्ही देऊ शकता
  2. गूळ- गुळाची ढेप ही देखील एक उत्तम पर्याय आहे. गुळाचा वापर हा अनेक खाद्यपदार्थांमध्ये होतो.
  3. पोहे- पोह्यांशिवाय अनेकांची सुरुवात होत नाही. पोहे देखील तुम्ही देऊ शकता.
  4. शेंगदाणे- शेंगदाण्याचा उपयोग अनेक पदार्थांमध्ये होतो.
  5. रवा- रव्यापासून गोड आणि तिखट असे दोन्ही पदार्थ बनवले जातात.
  6. बदाम- बदाम आरोग्यासाठी चांगले असतात. तुम्ही बदामाचे पाकिट देखील देऊ शकता.
  7. अंगाचा चांगला साबण – उत्तम दर्जाचा साबण हा देखील तुम्हाला देता येईल.
  8. भांडी घासण्याच वडी- घरात नेहमी वापरल्या जाणाऱ्या पैकी ही एक गोष्ट आहे.
  9. डबा- एखादा छान डबा देखील तुम्ही तुमच्या हळदीकुंकवाला देऊ शकता.
  10. पाण्याची बाटली, तेलाची बुथली, वाटी, कप,कापडी पिशवी,श्रृगांराच्या वस्तू असे कोणतेही उपयोगी पडतील असे काहीही तुम्ही वाण म्हणून देऊ शकता.

मग यंदा हळदीकुंकवाला तुम्ही काय देणार आहात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *