पालकवर्गासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण त्यांच्या खिशाला आता अधिक कात्री बसणार आहे. कारण पालकांना शुल्क वाढीचा चांगलाच फटका बसणार आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा झालेल्या जून – जुलैच्या पुरवणी परीक्षेपासून दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुल्क वाढीचा भुर्दंड बसणार आहे.
दहावीसाठी 440 तर बारावीसाठी 550 शुल्क भरावे लागणार आहे. राज्य मंडळ स्वायत्त संस्था असल्याने आर्थिक कारभार संस्थेच्याच स्तरावर केला जातो. राज्य मंडळाने 2017 मध्ये केलेल्या शुल्कवाढीनंतर गेल्या सहा वर्षांत शुल्कवाढ केली नाही. मात्र दरम्यानच्या काळात मंडळाच्या खर्चामध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली. राज्य मंडळ तोट्यात चालले आहे.