कोरोनाचे रुग्ण वाढतायतकोरोनाचे रुग्ण वाढतायत

Covid Update केरळमध्ये कोरोना व्हायरसचा एक नवा व्हेरिएंटचा रुग्ण सापडल्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी खबरदारी पाळण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.परंतु केरळातच नाही तर संपूर्ण देशभरात विविध राज्यामंध्ये कोरोनाच्या रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. ही वाढती संख्या पाहता येत्या काही काळात नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे असणार आहे. कारण रुग्णांची संख्या ही काही गतीने वाढताना दिसत आहे. नक्कीही आकडेवारी काय सांगते जाणून घेऊया.

सध्याची कोव्हिड आकडेवारी | Covid Update

देशात कोरोनाची सक्रिय प्रकरणे: 2311
गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 341 रुग्ण आढळले, केरळमध्ये 3 रुग्णांचा मृत्यू
केरळ : 292
तामिळनाडू: 13
महाराष्ट्र: 11
कर्नाटक : 9
तेलंगणा आणि पाँडिचेरी : 4
दिल्ली आणि गुजरात : 3
पंजाब आणि गोवा: 1

हा आकडा पाहता कोरोनाची ही लागण आताच रोखणे हे गरजेचे असणार आहे. जर तुम्हाला काही लक्षण जाणवत असतील तर तुम्ही तातडीने जवळील रुग्णालयात किंवा योग्य डॉक्टरकडे जाऊन त्याचा सल्ला घेणे गरजेचे आहे. या आजाराला घाबरुन न जाता योग्य पद्धतीने उपचार घेतला तर तुम्हाला काहीही होणार नाही. म्हणूनच खबरदारी, स्वच्छता ही महत्वाची असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *