राशीनुसार निवडा तुमच्यासाठी रंगराशीनुसार निवडा तुमच्यासाठी रंग

Color According Zodiac Sign प्रत्येक राशीचा असा एक रंग असतो. जर तो रंग तुमच्या खास गोष्टींमध्ये असेल तर तुम्हाला त्यापासून अधिक लाभ मिळण्यास मदत मिळते. काही रंग हे काही राशींना पूर्णपणे वर्ज्य असतात. जर अशा रंगाचा वापर तुम्ही तुमच्या काही खास निर्णयांच्यावेळी घातला तर त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते असे मानले जाते. राशीच्या स्वभावानुसार रंगही अगदी ठरलेले असतात. तुमची रास कोणती? आणि तुमच्या राशीचा रंग कोणता हे आज आपण जाणून घेणार आहोत. या राशीच्या रंगाचा उपयोग नेमका कसा करावा याची देखील आपण माहिती घेणार आहोत.

Baby Names From A | ‘अ’वरून मुलामुलींची नावे 2024

हे आहेत तुमच्या राशीनुसार तुमचे रंग

प्रत्येक रास ही तुमचा स्वभाव ठरवत असते. त्यानुसारच तुम्हाला काही रंग आवडत असतात. परंतु जर रंगाचा सकारात्मक असा उपयोग करुन घ्यायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या यादीनुसार रंगाची निवड करायला हवी.

  1. मेष : मेषराशीचे जातक हे बोल्ड आणि सतत काहीतरी नवे ट्राय करण्यासाठी उत्सुक असतात.आयुष्यात येणारी चॅलेंजेस त्यांना कायम चांगली आणि नवी काम करण्यासाठी उद्ययुक्त करत असतात. अशा राशीच्या लोकांसाठी लाल आणि लाल रंगाची गडद शेड ही अधिक लकी असते.
  2. वृषभ: वृषभ राशीचे जातक हे ताकदवान आणि कायम लक्झरी लाईफ आवडणारे असतात.अशा जातकांनी पांढरा आणि आकाशी रंगाचे कपडे घालणे हे केव्हाही चांगले.
  3. मिथुन : कन्या राशीचे जातक हे कायम सकारात्मक असतात. या राशीच्या लोकांसाठी हिरवा रंग हा अधिक चांगला आणि प्रगतीसाठी अनुकूल असा असतो.
  4. कर्क: कर्क राशीच्या जातकांवर चंद्राचा अधिक प्रभाव असतो. अशा व्यक्ती या फारच इमोशनल असतात. त्यांना अगदी बारीसारीक गोष्टींचेही वाईट वाटते. अशांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे हे कधीही चांगले
  5. सिंह : सिंह राशीचे जातक हे कायम लीडर अशा स्वरुपाचे असतात. त्यांना कोणीच थांबवू शकत नाही. त्यांचा ओरा नेहमी त्यांची ताकद, हुशारी दाखवत असतो. अशांसाठी लाल, गडद लाल, पिवळा किंवा पिवळ्याची शेड ही लकी मानली जाते.
  6. कन्या : कन्या राशीचे जातक हे हुशार असतात, त्यांच्यामध्ये जन्मत: अनेक गोष्टींचे नियोजन करण्याची क्षमता असते. या जातकांनी हिरव्या रंगाचे कोणतेही कपडे किंवा वस्तू घेतल्या तरी चालू शकतात.
  7. तुळ : तुळ राशीचे जातक हे कायम सगळ्यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करतात. हे कधीच कोणाला पटकन समजून येत नाही. तुळ राशीच्या लोकांसाठी गुलाबी आणि निळ्याचे शेड्स हे कायम लकी असतात.
  8. वृश्चिक : वृश्चिक राशीचे जातक हे हुशार पण एखाद्यावर राग असेल तर तो कायम ठेवणारे असतात. दिलं तर प्रेम नाहीतर दुश्मनी कायम ठेवतात. पण या व्यक्ती तितक्याच भावुक असतात. त्यांच्या या अशा पर्सनॅलिटीसाठी काळा हा रंग अत्यंत शुभ मानला जातो.
  9. धनु: धनु राशीच्या जातकांवर ज्युपिटरची कायम सत्ता असते. त्यामुळे असे लोकं कायम स्पष्टवक्ते आणि बोल्ड असतात अशांना पिवळा रंग हा कायम उठून दिसतो.
  10. कुंभ : कुंभ राशीचे जातक हे कायम स्वत:चेच खरे करणारे असतात. या लोकांना नवनवीन गोष्टी करायला खूपच जास्त आवडते.निळा, जांभळा, पांढरा आणि सगळे ब्राईट रंग हे या लोकांना अधिक फायद्याचे ठरतात.
  11. मकर : मकर राशीचे जातक हे फारच जास्त मेहनती असतात. त्यांना मेहनत करुन सगळ्या गोष्टी मिळवायला खूपच जास्त आवडते. अशांसाठी निळा, गडद निळा हे रंग फारच जास्त फायद्याचे ठरतात.
  12. मीन : मीन राशीचे जातक हे स्वभावाने शांत असतात. पण तितकेच ते रहस्यमयी असतात. एखादी गोष्ट लपवणे त्यांना अगदी सहज जमते. नवनवीन गोष्टी करायला त्यांना आवडतात. पिवळा आणि केशरी रंग हा देखील तुम्हाला अधिक फायद्याचा ठरु शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *