Bhimashankar या देवस्थानाची आज आपण माहिती घेणार आहोत. 12 ज्योर्तिलिंगापैकी हे एक असून येथे भक्तांची चांगलीच गर्दी असते. तुम्हाला सध्या इतर ज्योर्तिलिंग करणे शक्य नसेल तर पुण्याहून काहीच अंतरावर असलेल्या भीमाशंकरला भेट द्यायला हवी. पुण्यातील खेड- भोरगिरी गावात हे मंदिर आहे. सह्याद्री पर्वतावर असलेले हे मंदिर अनेकांसाठी आजही आकर्षणाचे ठिकाण आहे. येथून कृष्णा नदी वाहते. 12 ज्योर्तिलिंगामधील हे सहाव्या क्रमांकावर आहे. 12 ज्योर्तिलिंगाची यात्रा करताना अनेक लोक येथे येतात. या मंदिराची खासियत अशी की शिवपुराणात या मंदिराचा उल्लेख करण्यात आला आहे. नागर शैलीत बांधण्यात आलेले हे मंदिर अत्यंत सुंदर आहे. चला जाणून घेऊया या मंदिराविषयी अधिक
Ujjain Mahakaleshwar | वाचा उज्जैन महाकालेश्वरची कथा, अशी प्लॅन करा टूर 2024
असे विराजित झाले शिवलिंग
देशाच्या 12 विविध ठिकाणी आपल्याला शिवलिंग पाहायला मिळतात. पण त्यामागे त्यांची विशेष अशी कथा आहे. जी जाणून घेतल्याशिवाय आपल्याला त्याविषयी अधिक माहिती कशी मिळू शकेल. तर या शिवलिंगासंदर्भात एक अशी कथा सांगितली जाते जी पुराणात अनेक ठिकाणी उल्लेखलेली आहे.
पुराणात अशी कथा सांगितली जाते की,कुंभकर्णाला भीम नावाचा एक राक्षस पुत्र होता.त्याचा जन्म त्याच्या पिताच्या मृत्यूनंतर झाला . कुंभकर्णाचा मृत्यू हा रामाच्या हातून झाला हे त्याला काही माहीत नव्हते. ज्यावेळी त्याला ही गोष्ट कळली त्यावेळी रामाचा वध करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. आपले उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी हजारो वर्षे कठीण अशी तपश्चर्चा केली आणि ब्रम्हदेवाला प्रसन्न केले. त्यांंच्याकडून सदाविजयी होण्याचा वरदान मागितला. जो ब्रम्हदेवांनी त्याला दिला. त्या आशीर्वादानंतर त्याने उत्पात करायला सुरुवात केली. मनुष्य, देव-देवी या सगळ्यांना तो भयभीत करु लागला. त्याच्या जाचाला सगळे कंटाळून गेले. त्या सगळ्यांनी भगवान शिवाला शरण जाण्याचे ठरवले. आता भगवान शिवच आपल्याला यातून तारु शकेल हे त्यांना माहीत होते. भगवान शिवांनी त्याच्याशी युद्ध केले आणि त्याची राख करुन टाकली. त्याच्या अत्याचारातून लोकांना मुक्ती मिळाली. त्यावेळी भगवान शिवांना लोकांनी त्याच ठिकाणी शिवलिंग रुपात विराजमान होण्याची विनंती केली. तेच हे भीमाशंकर मंदिर होय
या शिवलिंगाचा आकार इतर शिवलिंगांपेक्षा मोठा असल्यामुळे त्याला मोटेश्वर शिवलिंग असे देखील म्हणतात. येथे जर जाणार असाल तर या ठिकाणी राहण्याची देखील सोय तुम्हाला मिळते. महाशिवरात्रीच्या काळात येथे फार मोठी जत्रा भरते.
असे करा प्लॅनिंग
पावसाळा वगळता तुम्हाला वर्षभरात कधीही या मंदिरात जाता येते. निसरडा रस्ता आणि धो- धो पाऊस असेल तर येथे जाण्याचा प्लॅन करु नका. येथे जाण्यासाठी तुम्हाला ट्रेन, बस, टॅक्सी असा कोणताही पर्याय अवलंबता येईल. भीमाशंकरला जाण्यासाठी तुम्हाला येथून काही एसटी बस देखील मिळतील. ज्या तुम्हाला थेट तेथे पोहोचवतील. महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी हे खूपच जवळचे असे ठिकाण आहे.
तर तुम्ही या ठिकाणी जाण्यासाठी नक्कीच लवकरात लवकर प्लॅनिंग करा.