Bad Office Habbit हल्ली कामाच्या गडबडीत आपल्या सगळ्यांना कुठे इतका चांगला वेळ मिळतो. अनेकांच्या कामाचं स्वरुपच असे आहे की, त्यांचे अगदी तीनही प्रहर ऑफिसमध्ये जातात. त्यामुळे होते असे की, आपल्या सगळ्या शेड्युलची वाट लागून जाते. इथेच आपल्याला काही वाईट सवयी लागतात. ज्यापुढे जाऊन त्रासदायक ठरतात. तुम्ही ऑफिसमध्ये असताना या चुकीच्या सवयी लावून घेतल्या असतील तर वेळीच आवरा बरं का! कारण याचा त्रास तुम्हाला नक्कीच होणार आहे हे लक्षात ठेवा.
एका जागी बसून खाणे
पूर्वीसारखं हल्ली लंच टाईम असा काही राहिलेला नाही. जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी जेवणाची सवय अनेकांना लागली आहे. त्यातही कधीकधी असे होते की, जेवणावरुन अर्धवट उठणे किंवा कामामुळे एकाच जागी बसून खाता येईल असे पदार्थ खाणे, अशा सवयींमुळे होते असे की, तुमचे वजन वाढायला सुरुवात होते, त्वचा खराब दिसू लागते आणि तुमची पर्सनॅलिटी अनाकर्षक दिसू लागते. एकदा का असे वजन वाढले की, ते कमी होता होत नाही. असे तुमच्यासोबत घडत असेल तर तुम्ही कदाचित ही सवय लावून घेतली आङे. सतत खाणे आणि एका जागेवर बसून खाणे याचा परिणाम हा तुमच्या पचनक्रियेवरही होतो. ज्यामुळए कायम ब्लोटिंग आणि ॲसिडिटीचा त्रास होत राहतो.
सतत एसीमध्ये राहणे
आपल्या शरीराला ऑक्सिजनची गरज असते. ऑफिसमध्ये काम करताना अनेकदा एसीमध्ये बसणे बंधनकारक असते. परंतु जर तुम्हाला एसीमधून बाहेर पडून थोडे बाहेर पडता आले तर चांगले. कारण अनेकांना ऑफिसमध्ये एसीची इतकी सवय झालेली असते की, ते जरा बाहेर आले की, त्याला असह्य घाम येऊ लागतो. त्यामुळेही ते अस्वस्थ होतात. त्यांची चिडचिड होऊ लागते. घरात सतत एसी लावू शकत नाही. म्हणून देखील अशांना एसीच्या बाहेरच्या वातावरणात जुळवून घेणे फारच कठीण जाते.
जेवण टाळणे
एका जागेवर बसून खाणारी लोकं जरी असली तरी कितीतरी लोकं अशी आहेत. जी वेळेवर खात नाहीत किंवा अजिबात खात नाही. त्यांना भूक मारायची सवय झालेली असते. कशाला जेवायचे असा विचार करुन ते जेवण टाळत राहतात. खूप जण आपले मिल स्किप करताना दिसतात. जर तुम्हाला अशी सवय लागली असेल तर तुम्ही त्याकडे अधिक लक्ष द्या. कारण त्यामुळे तुमची इम्युनिटी कमी होऊ शकते. जे विविध आजारांना आमंत्रण देते
आता या सवयी असतील तर आताच थोडा विचार करुन ते बदलण्याचा प्रयत्न करा.