रामजन्मभूमी अयोध्या येथे नव्या वर्षात मंदिराचा भव्य दिव्य सोहळा होणार आहे. या मंदिराचे काम नुकतेच पूर्ण झाले असून याच्या सौंदर्यात कोणतीही कमतरता होणार नाही अशापद्धतीने बांधकाम करण्यात आले आहे. या मंदिराच्या सोहळ्यासाठी देशातूनच नाही तर परदेशातूनही रामभक्त उपस्थित राहणार आहेत. येत्या 22 जानेवारी रोजी हा दिमाखदार सोहळा होणार आहे. त्याचे अंगावर काटा आणणारे नियोजन ऐकले तर तुम्हाला आता या क्षणी राम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जावेल असेच वाटणार आहे. हिंदूसाठी आणि रामभक्तांसाठी हा अत्यंत महत्वाचा असा क्षण असणार आहे.
असणार दिमाखदार सोहळा
अयोध्यानगरीत होणारा हा दिमाखदार सोहळा विविध कार्यक्रमांनी बहरलेला असणार आहे. यासाठी विविध राज्यांमधील सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे अनावरण केले जाणार आहे. त्यामुळे या तयारीत कोणतीही कमतरता होणार नाही याची विशेष काळजी घेतली जात आहे. उत्तर प्रदेशातील सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच यावेळी इतर राज्यांतील कार्यक्रमांची देखील आखणी करण्यात आलेली आहे. 1400 हून अधिक कलाकार यावेळी आपली कला सादर करणार आहेत.
कसा असणार सात दिवसीय सोहळा ?
15 जानेवारी – उद्घाटन
16 जानेवारी – सोमा घोष यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम
17 जानेवारी – अलका झा, सुरेश आनंद आणि घनश्याम जी यांची भजनाची संध्या
18 जानेवारी – अनुप जलोटा यांचे भजन आणि संगीत
20 जानेवारी – रामायण मालिकेतील अभिनेत्यांची उपस्थिती
21 जानेवारी – कवी मनोज शुक्ला यांचा कार्यक्रम
22 जानेवारी – पद्मश्री सुरेश वाडकर यांचे कार्यक्रम
आता जर तुम्हाला या ठिकाणी जायचे असेल तर या वेळापत्रकाचा विचार करुनच प्लॅन करा.