उध्दव ठाकरे म्हणजे ‘पोकळ शब्दांचे खोडकळ नेते’ आहेत, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी पलटवार केला. ‘मी करणार म्हणजे करणार! आरक्षण देणार म्हणजे देणारच! शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार म्हणजे करणारच! शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार म्हणजे करणारच! महापालिकेवर भगवा फडकवणार म्हणजे फडकवणारच! अशा गेल्या 10 वर्षात 1 हजार 531 घोषणा केल्या. आमच्या कार्यालयाने कालच यांची मागची दहा वर्षातील भाषणे काढली. त्यामध्ये आश्चर्यकारक माहिती समोर आली. काय झाले पुढे त्यांचे? त्यामुळे यांच्या शब्दाला किंमतच नाही असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.
पंतप्रधानांसोबत ऐकेरी बोलू नका
पंतप्रधानांच्या कुटुंबाचा विषय तुम्हीच काढलाच आहे तर मग तुम्हाही काही प्रश्नाची उत्तरे द्यावे लागतील, सांगा उध्दवजी की, तुम्ही तुमच्या सख्या भावा विरोधात न्यायालयात लढलात की नाही? तुमचे तुमच्या वहिनी सोबत कौटुंबिक नाते आहे, की भांडण? वडिलांची मालमत्ता तुम्ही हडप केली म्हणून तुमच्याच सख्या भावाने आरोप केले की नाही? चुलत भावाला घराबाहेर, पक्षातून बाहेर
काढण्यात तुम्हाला आनंद मिळाला की नाही? असे कुटुंबातील बरेच विषय निघतील. त्यामुळे आमच्या पंतप्रधानांच्या कुटुंबावर तर बोलू नकाच, ऐकेरीत अजिबातच बोलू नका. यापुढे पंतप्रधानांचा ऐकेरी उल्लेख केलात तर आमचे नेते पण तुमचा अपमान करतील, तो सहन करण्याची तयारी ठेवा, असा इशारा देत आमदार अँड आशिष शेलार यांनी आम्ही ‘मेरी माटी मेरा देशवाले’ आहोत तुमच्या सारखे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ वाले नाही, असा टोला लगावला आहे.
ज्यांची मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये असलेली सत्ता जाण्याची वेळ आली आहे, त्यांना महाराष्ट्रात आणि देशात सत्ता येणार अशी स्वप्न पडू लागली आहेत. तुमचे खासदार सोडून गेले, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीचे सदस्य, सरपंच सगळे पक्ष सोडून गेले मग तुमची ग्रामपंचायतीत जी सत्ता होती ती तरी टिकेल का? असा टोला आमदार अँड आशिष शेलार यांनी लगावला आहे.मुंबईत आलेले उद्योग पळवून लावायचे तुम्ही, मुंबईत बुलेट ट्रेन, मेट्रो, मेट्रो कारशेड, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, नवे विमानतळ, जैतापूर प्रकल्प, वाढवण बंदर प्रत्येक प्रकल्पाला विरोध उबाठाने केला. हे विकासाच्या वाटेतील गतिरोधक झाले आहेत, हे कालच्या भाषणात जाहीर पणे त्यांनी दाखवले, कसा टोला आमदार अँड आशिष शेलार यांनी लगावला.