Baby Food हा नवमातांसाठी अत्यंत महत्वाचा असा विषय आहे. आपल्या बाळाला काय खायला द्यावे आणि काय नाही यासाठी प्रत्येक पालक फारच सजग असतात. बाळाच्या पोटात चांगलेच पदार्थ जायला हवे असा सगळ्यांचाच अट्टहास असतो. परंतु आपणच त्यांना अजाणतेपणी असे काही पदार्थ खाऊ घालतो जे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले असतीलच असे सांगता येत नाही. असे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे खूप जणांना पुढे जाऊन काही त्रास जाणवू लागतात. त्यासाठी काही खाद्यपदार्थ कारणीभूत असतात असे निदर्शनास आले आहेत. चला जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे बाळांना देणे 1 ते 2 वर्षांपर्यंत योग्य नाही.
AlaskaPox Virus | कोरोनानंतर अमेरिकेत वाढतेय या व्हायरसची भिती, एकाचा मृत्यू
Baby Food जे टाळायला हवे
आपल्या मुलांनी उत्तम खावे असे आपल्या सगळ्यांना वाटते. परंतु आपल्याला हेल्दी वाटणारे पदार्थ हे त्यांच्या आरोग्यासाठी किंवा शरीरासाठी योग्य असतील असे होत नाही. आम्ही अशा काही वस्तूंची यादी केली आहे जी माहीत असणे प्रत्येक पालकासाठी गरजेचे आहे.
- सोयाबीन- सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते हे आपण सगळेच जाणतो. परंतु ते पचण्यासाठी थोडा वेळ घेते. लहान मुलांची पचनशक्ती ही तितकी नसते की, ते सोयापासून बनवलेले खाद्यपदार्थ खाऊ शकतील. जर तुम्ही हेल्दी म्हणून सोया असलेल्या कोणत्याही गोष्टी मुलांना खाऊ घालत असाल तर तसे अजिबात करु नका.
- साखर- काही बाळांना लहानपणी इतकी गोड खाण्याची सवय लागते की, ते गोडासाठी विचित्रच हट्ट करतात. तुम्हाला शक्य असेल तर लहान बाळांना त्यांच्या आहारातून नैसर्गिक साखर द्या. उदा. फळांमध्ये, दुधामध्ये एक गोडवा असतोच. तोच त्यांच्यासाठी पुरेसा आहे. परंतु खास साखर घातलेले पदार्थ जसे की, केक, मिठाई इ. त्यांना खाण्यास देऊ नका.
- मीठ- मीठ हे चवीपुरतं खाणं हे चांगले असले तरी त्याचा अतिरेक हा सगळ्यांसाठीच घातक असतो. विशेषत: लहान बाळांसाठी तर जास्त मीठाचे सेवन हे घातक ठरु शकते. त्यामुळे फ्राईज, चिप्स असे पदार्थ देऊन मुलांना अति मिठाचे पदार्थ खाण्यास अजिबात देऊ नका.
- गाईचे दूध- गाईचे दूध हे पूर्णान्न असले तरी देखील ते बाळांसाठी चांगले नाही. बाळाला जन्मानंतर काही काळ हे आईच्या दुधावरच अवलंबून राहावे लागते. आई जितकं दूध बाळाला पाजेल तितके ते त्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते.
- आंबट फळे- फळं ही बाळांच्या आरोग्यासाठी उत्तम असली तरी देखील आंबट फळं ही जास्त मुलांना देऊ नका. आंबट ही चव मुलांना नुकसान देऊ शकते.
तर तुमच्याकडेही तान्हं बाळ असेल तर त्यांना काही गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवायला हव्यात.