Keep Away Heart Attack असं म्हणण्याची वेळ आली आहे. कारण हल्ली वृद्धांपेक्षा तरुणांना मोठ्या प्रमाणात अटॅक येऊ लागला आहे. अगदी विशीतील तरुणांचाही यात समावेश आहे. याला कारणीभूत आहे आताची बदलती लाईफस्टाईल. या बदलत्या लाईफस्टाईलमुळे, खानपान पद्धतीमुळे वृद्धापकाळात होणारे त्रास हे आपल्याला आताच होऊ लागले आहेत. म्हणूनच काही लहान बदल केले आणि चांगल्या सवयी लावल्या तर त्याचा फायदा आपल्या आरोग्याला होण्यास मदत होईल. आयुर्वेदात अशा काही गोष्टी आहेत ज्यांचे सेवन केले तर तुम्हाला नक्कीच ह्रदय चांगले ठेवण्यास मदत मिळेल.
AlaskaPox Virus | कोरोनानंतर अमेरिकेत वाढतेय या व्हायरसची भिती, एकाचा मृत्यू
अर्जुनाची साल
ह्रदयाचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी अर्जुनाची साल ही खूपच फायद्याची ठरते. आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला अर्जुनाची साल किंवा त्याची पूड मिळू शकते. ती घरी आणून पाण्यामध्ये उकळून ते पाणी प्यावे. त्यामुळे तुमचा ह्रदयाचा रक्तप्रवाह हा अगदी नीट होतो. त्यामुळे याचे सेवन करावे.
आलं- हळद
आपल्या घरात सहज उपलब्ध असलेली गोष्ट म्हणजे आलं आणि हळदं. ही देखील आरोग्यासाठी खूपच लाभदायक असते. जर तुम्हाला ओली हळद मिळाली तर उत्तम. नाहीतर घरी असलेली हळद आणि किसलेलं आलं चांगलं उकळून त्याचा चहा करुन प्याल तर त्याचा फायदा देखील तुम्हाला होऊ शकेल. केवळ ह्रदयासाठीच नाही तर त्वचेसाठीही हा चहा खूपच फायद्याचा ठरतो.
दालचिनी
मसाल्यात वापरली जाणारी दालचिनी ही देखील आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असा प्रकार आहे. घरात दालचिनीची पूड करुन ठेवा. पाण्यात घालून ते पाणी चांगलं उकळा आणि त्याचे सेवन करा. दालचिनीमुळेही आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. शिवाय रोगप्रतिकार शक्तीही वाढते. दालचिनीचा उपयोग अनेकदा काढ्यांमध्ये केला जातो.
आता निरोगी आरोग्यासाठी चहा सोडून याचे सेवन आजच सुरु करा.