अश्वजित गायकवाड प्रिया सिंहअश्वजित गायकवाड प्रिया सिंह

Thane News ठाण्यात काही दिवसांपूर्वी प्रिया सिंह या मुलीवर तिच्या प्रियकराने गाडी घातल्याची घटना घडली. या घटनेत प्रिया सिंहच्या पायाला चांगलाच मार लागला आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला शिक्षा मिळायला हवी म्हणूनच प्रियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यावर झालेली आपबिती सांगितली. या प्रकरणात रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा अश्वजित गायकवाड याचे नाव असल्यामुळे या प्रकरणाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. हिंमतीने मुलीने तक्रार करुन न्याय मिळण्याची अपेक्षा केली परंतु पोलिसांनी लावलेल्या जामिनपात्र कलमांमुळे अश्वजितला जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे न्यायासाठी आता प्रिया सिंह ही उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे समजत आहे.

अश्वजित गायकवाड (Ashwajit Gaikwad) मोठ्या अधिकाऱ्याचा मुलगा असल्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गंभीर कलम लावलेले नाही असे प्रियाच्या घरच्यांचे म्हणणे आहे. पोलिस त्याला शिक्षा होऊ नये यासाठीच प्रयत्नात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. इतका गंभीर गुन्हा करुन देखील कोर्टाकडून त्याला इतक्या सहज जामीन मिळणे म्हणजे आमच्यावर अन्याय आहे. दरम्यान, प्रियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीचा खुलासा केल्यामुळे हे प्रकरण समोर आले आहे. प्रियाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. अश्वजितसोबत असलेले त्याचे दोन सहकारी रोमिल पाटील आणि सागर शेळके यांनी देखील त्याला या कामामध्ये मदत केल्याचे समजत आहे. त्यामुळे त्यांनाही यासंदर्भात शिक्षा मिळणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्र्याच्या ठाण्यात एखाद्या मुलीवर असा अन्याय होणे हे अजिबात चांगले नाही अशी प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

नेमकं प्रकरण काय?

प्रिया सिंह ही सोशल मीडियावरील नावाजलेला चेहरा आहे. तिचे अश्विजित गायकवाड यांच्यासोबत गेल्या काही वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरु आहे. 11 डिसेंबरच्या रात्री अश्वजितने प्रियाला ठाण्यातील घोडबंदर येथे असलेल्या ओवळा येथे भेटण्यासाठी बोलावले. ठरल्याप्रमाणे त्यांची भेट झाली. या भेटीदरम्यान त्या दोघांमध्ये भांडणं झाली. त्यावेळी त्याच्यासोबत आलेल्या रोमिल पाटील आणि ड्रायव्हर सागर शेळके यांच्या सांगण्यावरुन अश्वजितने आपली रेंज रोव्हर गाडी ही प्रियाच्या अंगावरुन घालण्याचा प्रयत्न केला. यामध्ये प्रियाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तिला त्याच अवस्थेत सोडून हे तिघे निघून गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *