Corona 2019 ते 2022 ही वर्षे संपूर्ण जगासाठी फारच कठीण होती. कधीही न थांबणारे जग अचान या आजारामुळे एकाकी थांबून गेले. आता कुठे त्या आजारातून आपण डोकं वर काढून पुन्हा एकदा सर्वसामान्यपणे जगू लागलो आहोत. त्या आजाराच्या भीतीने बाहेर आलो आहोत. तोच आता पुन्हा एकदा या आजाराने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. केरळमध्ये कोरोनाच्या एका नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळून आल्यामुळे सरकार पुन्हा एकदा अलर्ट झाले आहे. येत्या काही काळात सण- उत्सव सुरु होतील. गर्दी होईल त्यामुळे खबरदारी बाळगणे हेच आपल्या हातात आहे.
केरळमधील तिरुअंनतपुरम येथील एका 79 वर्षीय महिलेला कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटची लागण झाल्याचे कळत आहे. त्यानंतर लगेचच येथील राज्य सरकारने केंद्राला याबाबत अलर्ट दिला आहे. या विषाणूची लागण होऊ नये आणि पुन्हा एकदा देशासमोर नवे संकट उभे राहू नये यासाठी खबदारी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. तुम्हालाही कोरोनासारखी काही लक्षणे जाणवत असतील तर योग्यवेळी काळजी घेणे हेच सध्या योग्य ठरेल.
Ok we will take care
thanks for telling us that