Baby Names From A या आद्याक्षरावरुन मुलामुलींची नावं शोधत असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. मुलांमुलींची नावे अर्थपूर्ण असावीत असे आपल्याला नेहमी वाटते. त्यामुळे घरी नवे बाळ येणार असेल तर त्याच्या तयारीला आपण सगळेच लागतो. अगदी नावांची देखील मनात कुठेतरी तयारी सुरु असते. काही जण मुलांची नावे राशीवरुन ठेवतात. तर काही जणांनी आपल्या बाळाचे आद्याक्षर काहीही येऊ दे मनाशी त्यांनी काही नावे ही नक्की केलेली असतात. जर तुमच्या बाळासाठी आद्याक्षर A आले असेल तर मुलामुलींची कोणती नावे ठेवता येतील ते आता जाणून घेऊया.
तुमचीही मुलं चिडचिड करतात, मग नक्की वाचा
अ वरुन मुलांची नावे अर्थासह Baby Names From A

तुम्ही मुलांची नावे शोधत असाल तर खाली दिलेली मुलांच्या नावाची यादी नक्की पाहा. ती तुम्हाला आवडतील.
- अग्रिम- सगळ्यात पहिला, प्रभू रामांचे एक नाव
- आरव- शांत
- अद्वैत- अद्वितीय, यासम कोणी नाही
- आलोक- प्रकाशित, चमकदार
- अर्जुन- कायम चमकणारा
- आयुष- दीर्घायुषी असा
- अयान- देवाचा अत्यंत प्रिय
- अभिनव- नवीनता असणारा
- अर्णव- समुद्रासारखा
- अंशुल- उज्वल प्रकाश
- आदित्य- सूर्यदेवाचे एक नाव
- आदि- सगळ्यात आधी, सुरुवात
- आरुष- सूर्याचे पहिले कोवळे किरण
- अमित- कोणत्याही सीमा नसलेला
- अनिकेत- संपूर्ण जगाचा देव
‘अ’ वरुन मुलींची नावे अर्थासह
अ हे आद्याक्षर तुमच्या लाडक्या मुलीसाठी आले असेल तर ही काही हटके नावे तुम्हाला ठेवता येतील.
- अवनि- पृथ्वी, धरा
- आयुषी- दीर्घायुषी
- अशिता- आशा असलेली
- अशिका- आनंदी, सदा आनंदी असणारी
- अरुणा- सकाळचे पहिले कोवळे उन
- आराधना- प्रार्थना
- ऐश्वर्या- भरभराट, संपन्न
- आदिती- कोणतीही सीमा नसलेली
- आयशा- जिवंत
- अनिका- उत्साही
- अरिआ- राग, एखादे सुंदर गाणे
- अनाया- अत्यंत वेगळी
- अर्यिषा- आदरणीय
- आहाना- आतला प्रकाश
- अन्विता- हुशार
- आर्तिका- संध्याकाळचा दिवा
- आर्यही- माता दुर्गेचे एक नाव
- आईशा- सदाबहार
- औरिका- सोन्यासारखी
- अनुषा- आशेचा किरण
आता ही काही सुंदर नावे तुम्हाला तुमच्या बाळांसाठी नक्की ठेवता येतील .