Onion For Hair या विषयी आज आपण अधिक माहिती घेणार आहोत. आपले केस सुंदर आणि दाट असावेत असे आपल्यापैकी कित्येकांना वाटते. पण सुंदर केस सगळ्यांनाच काही जन्मत: मिळत नाही. काहींना केसांचे सौंदर्य राखण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. घरातच काही सोपे उपाय करुन तुम्हाला तुमच्या केसांची काळजी घेता येऊ शकते. केसांना केवळ वरुन वरुन गोष्टी करणे गरजेचे नसते तर तुम्हाला चांगला आहारही घेणे फार गरजेचे आहे. त्यासोबत जर तुम्ही काही गोष्टी केल्या तर तुमचे केस खूपच सुंदर राहतील यात काहीही शंका नाही. जसे की कांद्याचे पाणी हे केसांसाठी फारच फायद्याचे असते असे मानले जाते. त्याचा उपयोग केल्याने तुम्हाला सुंदर केस मिळण्यास मदत मिळते.
Onion For Hair फायदे

केसांसाठी कांद्याचे पाणी कसे फायद्याचे ठरते हे जाणून घेणेही तितकेच गरजेचे आहे. त्यात नेमके कोणते घटक असतात हे आता जाणून घेऊया.
- कांद्यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. विशेषत: व्हिटॅमिन C, B आणि मॅग्नीझ, पोटॅशिअमसारखे मिनरल्स असतात जे केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी मदत करतात.
- कांद्याच्या रसामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे तुमचे घातक किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे केसांचेही संरक्षण होते.
- कांद्याच्या रसामध्ये असलेले अँटीइन्फ्लेमेटरी घटक तुमचे संपूर्ण आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते.
- कांद्याच्या रसात असलेले काही घटक केसांची वाढ करण्यासाठी मदत करतात.
असा करा कांद्याच्या रसाचा उपयोग
कांद्याचे सेवन आपण जेवणात रोजच करतो. कांद्याचा रसाचा उपयोग केसांसाठी कसा करायचा ते जाणून घेऊया
- कांद्याचा रस काढून तो रस तुम्ही एका स्प्रे बॉटलमध्ये भरुन केसांच्या मुळाशी मारा. स्काल्पवर चांगला मसाज करा. तासभर ठेवून मग केस धुवून घ्या. कांद्याच्या रसाचा वास इतका उग्र असतो की, त्याचा वापर केल्यानंतर केसांवरुन त्याचा उग्र वास जाणे थोडे कठीण असते.
- कांद्याचा रस थेट तुमच्या केसांना अजिबात लावू नका. कारण त्यामुळे तुम्हाला त्वचेला खाज वगैरे येऊ शकते. त्यामुळे त्याचा फायदा होण्याऐवजी नाहक दुष्परिणाम होईल.
- कांद्याचा रस तुम्ही तुमच्या आवडीच्या तेलात घालूनही तुम्ही ते तेल केसांना लावून मसाज करु शकता त्यामुळेही तुम्हाला नक्कीच बरे वाटेल.